About Gadchiroli District

ssagadchirolizp.blogspot.in या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गडचिरेाली जिल्यातील शैक्षणिक समस्या, विविध शैक्षणिक उपक्रम याकरीता सदर ब्लॉग बनविण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर सर्व प्रकारच्या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिक्षण विभाग (प्राथ), जिल्हा परिषद गडचिरोली
सूचना क्रमांक 1 - 12/9/2017
प्रस्तावना :-
Unified District Information System for Education (U-DISE), जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकारमार्फत कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील इयत्ता 1 ते 12 पर्यंत शिक्षण देण्याऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या. माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या (C.B.S.E., I.C.S.E., I.B., IGCSE, State Board, other, इत्यादी) शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम केलेली माहिती जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्यामार्फत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास सादर करण्यात येते. सन 2012-13 या वर्षापासून इयत्ता 1 ली ते 12 वी या वर्गाच्या सर्व शाळांची माहिती (U-DISE) या प्रणालीमार्फत संकलित करुन संगणकीकृत करण्यात येत आहे. जिल्हा कार्यालयाकडून अंतीम करण्यात आलेली माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये     U-DISE प्रणालीमार्फत एकत्रित करून भारत सरकारकडे पाठविण्यात येते.

उद्दिष्टे :-
·    राज्यामधील सर्व जिल्हयांतील शाळांचा तपशील, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची संख्या, अनुदान, भौतिक मुलभूत सुविधा इत्यादी माहिती शिक्षण देण्याकरिता अत्यंत महत्त्वाची आहे.
·    बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम -2009 या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याकरीता अत्यंत महत्वाची आहे.
·    U-DISE प्रणालीमार्फत संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग भारत सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या योजनेच्या वार्षिक नियोजन अंदाजपत्रक तसेच प्रभावीपणे अमंलबजावणी करण्याकरीता आवश्यक आहे. U-DISE प्रपत्र मार्गदर्शन सूचना प्रपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई न्युपा, नवी दिल्ली  यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


·       अतिशय महत्वाची सूचना:-
सन 2017-18 पासून केंद्र शासनाने सरळ सरळ U-DISE क्रमांक देण्यावर बंदी घातली असून केंद्र शासनाच्या U-DISE पोर्टलवरुन आता नवीन मान्यता प्राप्त शाळांना U-DISE कोड दिल्या जाणार आहे. त्यामुळे ज्या शाळा नव्याने सुरु झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना अद्याप U-DISE क्रमांक मिळालेला नाही अशा शाळांनी खालील प्रमाणे नोंदणी करुन घ्यावी.
·       नोंदणी करावयाची वेब साईट - student.udise.in ही साईट ओपन करावी
·       Useful Links मधील Register your schools in U-DISE टॅब वर क्लिक करावा.
·       हे सॉफ्टवेअर शक्यतो Windows 7 किंवा त्यापेक्षा उच्च operating system मध्ये ओपन करावे
·       त्यानंतर School Directory Management System ओपन होईल.
·       त्यांनतर School Registration वर क्लिक करुन पुढील शाळा व संस्थेची माहिती भरुन भरलेली माहिती Forward करावी.
अधिक माहितीसाठी आपण ssagadchirolizp.blogspot.in या ब्लॉगला भेट द्यावी. यामध्ये SDMIS या टॅब मध्ये नवीन New School Registration नोंदणीसाठी लिंक देण्यात आली आहे.
प्रफुल मेश्राम
संगणक प्रोग्रामर
सशिअ गडचिरोली
8308315996